विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट
करमाळा(प्रतिनिधी); महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी करमाळा येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बायपास रोड येथील माजी आ. जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
प्रा राम शिंदे तुळजापूर येथे नियोजित दौऱ्याला जात असताना त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली ,याप्रसंगी त्यांचे चहापान झाले .माजी आमदार जयवंतराव जगताप व विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा जुना स्नेह आहे .
हेही वाचा – शहीद जवान नवनाथ गात यांचा वरकुटे येथे 2 मार्च रोजी स्मृतीदिन विविध कार्यक्रमाचे आयोजन
जनसेवा हीच ईश्वर सेवा फाउंडेशन केत्तूर मधील सदस्यांनी मिळवून दिला दोन निराधार महिलांना आसरा
यावेळी विधान परिषदेचे सभापतीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच करमाळा दौऱ्यावर आलेले प्रा राम शिंदे यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप व जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी यथोचित सत्कार केला व सभापती पदाच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या .