करमाळा सोलापूर जिल्हा

कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

केत्तूर (अभय माने) कुंभेज (ता. करमाळा) येथील महेश तोरमलचे एम.पी.एस.सी. परीक्षेत यश. महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड. कुंभेज येथील महेश बबन तोरमल या युवकाने जिद्द व प्रचंड परिश्रम घेत अशक्यप्राय वाटणाऱ्या यशाला गवसणी घातली आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या व संभ्रमावस्थेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना कुंभेजच्या महेश तोरमल या युवकाचे उदाहरण आशावाद निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरेल.

खेळाची प्रचंड आवड आणि स्पर्धा परीक्षेचा कसून सराव दोन्हींचा समतोल साधत सकारात्मक दृष्टीकोन बाळगत, संघर्ष असला तरीही मनावर ताण न येऊ देता त्याने परीक्षेची तयारी केली. लाखो रुपयांचे शुल्क घेऊन खाजगी शिकवणी वर्गाचे पेव फुटलेले असताना कधी पुण्यामध्ये तर कधी गावाकडे घरीच कल्पकतेने अभ्यासाचे नियोजन करून त्याने हे यश मिळवले आहे.

हेही वाचा – 100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

एसटी बसवरून नेते गायब; गाड्या झाल्या चकाचक, आदर्श आचारसंहितेचा परिणाम!

महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी झालेल्या निवडीबद्द्ल त्याच्या कुटूंबीयांसह शिक्षक, मित्र परिवार व कुंभेज ग्रामस्थांकडून त्याच्यावर कौतुक व अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

कुस्ती खेळात करीअर करावे अशी इच्छा व प्रयत्न करणाऱ्या वडिलांचे स्वप्न आपल्या मुलाने पीएसआय होऊन पूर्ण केल्याचा वडिल बबन तोरमल यांना विशेष आनंद व अभिमान वाटत आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!