कुंभारगाव येथे आषाढी वारीनिमित्त बाल वारकऱ्यांची बालदिंडीचे आयोजन
केत्तूर (अभय माने) शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय कुंभारगाव व जि.प.शाळा कुंभारगाव,जि प शाळा मालेवस्ती यांनी आषाढी वारीनिमित बाल दिङीचे काढण्यात आली.
यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान केला होता यामध्ये मुले पांडुरंगाची कपडे मुलींनी नऊवारी साड्या प्रधान केल्या होत्या. जि प शाळेपासून राम मंदिर राधाकृष्ण मंदिर संपूर्ण गावामध्ये सदर दिंडी काढण्यात आली यावेळी मुलांच्या हातात टाळ भगवेध्वज व मुखातून सुरू असलेल्या ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते.
मुलांमध्ये एक विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत जनाबाई यांच्या वेशभूषा करून कपाळी चंदन, अष्टगंध, बुका लावून टाळ मृदंग भगवे पताका डोक्यावर तुळस व वेगवेगळ्या वृक्ष दिंडीचे संदेश घेऊन बालचमोचा दिंडी सोहळा एक नवी स्फूर्ती देणारा वाटत होता.
वेगवेगळे अभंग मुला मुलींच्या पालक शिक्षक यांच्या फुगड्या झाल्या सदर दिंडीचे आयोजन शाळेने चांगल्या प्रकारे केले तसेच मुख्याध्यापक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता अध्यात्मिक दिनाच्या धडे मिळावेत या हेतूने या बालगोपालांच्या दिंडीचे आयोजन केले होते यावेळी शरदचंद्र पवार विद्यालयातील शिक्षक व सर्व कर्मचारी तसेच जि प शाळा कुंभारगाव जि प शाळा माळी वस्ती चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.