क्रिडा अधिकारी कैलास लटके यांची अंजनगाव येथील देवकते वस्ती शाळेस भेट;विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य व खाऊचे वाटप
माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यातील अंजनगाव येथील सुपुत्र आणि सध्या उस्मानाबाद येथे जिल्हा क्रीडा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले कैलास लटके यांनी आज अंजनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकते वस्ती येथील शाळेस् भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत गीत गाऊन केले व त्यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत देवकते यांनी श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कैलास लटके हे सध्या कार्यरत आहेत.ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत.अनेक कार्यक्र मांचे आयोजन ते विद्यार्थ्यांसाठी करत आहेत.आज त्यांनी देवकते वस्ती येथील मराठी शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक सलीम आतार शिक्षक प्रकाश अनभुले यांनी आभार प्रदर्शन केले .अंगणवाडी शिक्षिका मीराताई वाघमोडे व अंगणवाडी मदतनीस गोरे ताई व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता
Comment here