करमाळासोलापूर जिल्हा

कोंढेज येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोंढेज येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा :– सोलापूर जिल्हा नियोजन समितिचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करमाळा तालुक्यातील मौजे- कोंढेज येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या विकास कामात कोंढेज येथील खत्री दुकान ते महादेव मंदिर (मठ )रस्ता सिमेंट काँक्रिटी करणे , ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर यात्रा छबीना मार्ग रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे या कामांचा समावेश आहे.


याचबरोबर गावाकऱ्यांच्या लोक वर्गणीतून श्रीराम मंदिर बांधकामचे भूमिपूजनही श्री. चिवटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, शासनाचे विकासाचे धोरण समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवणे हेच सत्तेचे ध्येय असते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण हेच ध्येय एक व्रत म्हणुन काम करत आहोत.


करमाळा तालुक्याच्या विकासासाठी विविध गावात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केला आहे असेही चिवटे यांनी सांगितले.

हेही वाचा – रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका भाजपा यूवामोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा सोशल मिडीयचे माढा लोकसभा संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले.
या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष पै. अफसर जाधव, पांडुरंग बापु लोंढे व कोंढजचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित तसेच

litsbros