करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील केतूरच्या काळभैरवनाथ यात्रेस सुरूवात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील केतूरच्या काळभैरवनाथ यात्रेस सुरूवात

केत्तूर, (अभय माने) केत्तूर (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा मंगळवार (ता.11) ते बुधवार (ता.12) रोजी साजरी होणार आहे.यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (ता.11) रोजी देवाला हळद लावणे,तेल चढविण हे कार्यक्रम पार पडले तर दुसऱ्या दिवशी बुधवार (ता.12) रोजी सकाळी काळभैरवनाथ मूर्तीला गंगास्नान व अभिषेक आदि कार्यक्रम माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील व त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी मोरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

तर रात्री दहा वाजता गावातील प्रमुख मार्गावरून श्री काळभैरवनाथाची छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी फटाक्याची आतषबाजी व गुलाबाची मुक्त उधळण करण्यात येणार आहे.

हेही वाचा – करमाळा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटसह गारांचा पाऊस; शेतमालाचे लाखोंचे नुकसान

चांगली बातमी; अखेर करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला भुलतज्ञ मिळाले; रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रियेसाठी सक्षम व्यवस्था; रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. स्मिता बंडगर

यावेळी नवसाची शेरनी तसेच पेढे वाटप यासह प्रसादाचे वाटप होणार आहे.यात्रेनिमित्त मंदिरावर व मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा कमेटी परिश्रम घेत आहे.

litsbros

Comment here