करमाळासोलापूर जिल्हा

केत्तूर येथील श्री किर्तेश्वर देवस्थान येथे प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात अन्नदान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूर येथील श्री किर्तेश्वर देवस्थान येथे प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात अन्नदान

केत्तूर प्रतिनिधी – करमाळा तालुक्यासह इंदापूर,माढा,कर्जत, परांडा तालुक्यातील भावीक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या केत्तूर येथील पुरातन स्वयंभू असलेले हेमाडपंती बांधणीचे श्री किर्तेश्वर (महादेव) देवस्थान येथे प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येत आहे.अनेक भाविक भक्त अन्नदानासाठी इच्छुक असल्याचे श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री किर्तेश्वर देवस्थान अन्नछत्र समिती केत्तूर चे अध्यक्ष धनाजी अंबादास पाटील यांनी सांगितले.

श्री किर्तेश्वर देवस्थान अनादी पुरातन काळापासून असुन लिंग स्वयंभू आहे असे स्वयंभू लिंग आसपास पाहवयास मिळत नाही.वैजनाथ परळी या ठिकाणी असे लिंग पाहण्यास मिळते.मनो-भावे या महादेवाची पुजा केल्यास मनोकामना पुर्ण होतात.असे जाणकार भाविक भक्तां कडून सांगितले जात आहे.या देवस्थान च्या पश्चिम बाजूस उजनी धरणाचे निसर्गरम्य असे पाणी पाहवयास मिळत आहे.

हेही वाचा – कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान निमगाव केतकी येथील ग्रामस्थांनी दिला पुरस्कार

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

पुरातन शिवलाल अमृत,काशिखंड,योग वाशिष्ट या पौराणिक ग्रंथांत श्री किर्तेश्वर देवस्थान चा उल्लेख आढळतो.सन-१९९५ साली करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या शंकर भारती यांच्या उपस्थितीत तेरा कोटी नामजप यज्ञ संपन्न झाला होता.तर गेल्या श्रावण महिन्यात भव्य असा कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे. 

श्री किर्तेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने केत्तूर व पंचक्रोशीतील परिसर सुजलाम-सुफलाम असून हे देवस्थान नवसाला पावते.श्री किर्तेश्वरांच्याच नावावरुन या गावास केत्तूर हे नाव मिळाले असल्याच्या पौराणिक कथा आहेत. माजी सरपंच:-रामदास राऊत

litsbros

Comment here