क्रीडामाढाशैक्षणिक

चिंचोलीच्या जिल्हा परिषद शाळेच्या संघाने केली लंगडी मध्ये जिल्हा विजयाची हॅट्रिक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चिंचोलीच्या जिल्हा परिषद शाळेच्या संघाने केली लंगडी मध्ये जिल्हा विजयाची हॅट्रिक

माढा प्रतिनिधि – बार्शी येथे झालेल्या जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेच्या सामन्यात लहान गटांमध्ये माढा तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळा चिंचोली या संघाने अंतिम फेरीत पापरी ता.मोहोळ या संघाचा १७ गुणांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली. साखळी सामन्यांमध्ये प्रथम सांगोला या संघाला १२ गुणांनी पराभवाची धूळ चारत सामना एकतर्फी जिंकला.

यानंतर उपांत्य फेरीत ताडसौंदणे बार्शी या संघाला पराभूत केले.अंतिम फेरीत पापरी मोहोळ या संघाला १७ गुणांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली व जिल्ह्यात माढा तालुक्याचा दबदबा कायम राखला.

हेही वाचा – पोथरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे स्वागत; मोदी आवास योजनेच्या ९ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वाटप

सोमनाथ ओहोळ लिहितात.. ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक म्हणजे सर्वांना, सर्वांचे बाबासाहेब सांगणारे पुस्तक

विद्यार्थ्यिंनीना क्रीडा शिक्षिका माधुरी पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले गणेश  गणेश गोसावी, शहाजी ताकभाते, सुनील ठोंगे, सौदागर खताळ ,अर्चना पांडे यांचे सहकार्य लाभले. या विजयाबद्दल माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव केंद्रप्रमुख महादेव जठार चिंचोली चे सरपंच संतोष लोंढे उपसरपंच स्वाती लेंडवे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लेंडवे, उपाध्यक्ष विशाल लोंढे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

litsbros

Comment here