करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

केत्तूर मध्ये ‘असा’ आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम; सरपंच पदासाठी ‘हे’ चार जण रिंगणात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूर मध्ये ‘असा’ आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम; सरपंच पदासाठी ‘हे’ चार जण रिंगणात

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय मंडळीचे लक्ष लागून आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणी 12 जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 8 जणानी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होत आहे.

तर 11 सदस्य पदांच्या जागेसाठी 44 अर्ज दाखल झाली होती. त्यापैकी प्रभाग क्रमांक तीन व चार मधील उमेदवार निवडले गेले आहेत.

प्रभाग केत्तूर नंबर एक येथे
प्रभाग 1 मध्ये –
तीन जागांसाठी
तर प्रभाग 2 (केत्तूर न दोन) मध्ये 3 जागांसाठी निवडणूक होत आहे.

तालुका पातळी आमदार संजयमामा शिंदे गटाचे जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक राजेंद्रसिंह (अशोक) पाटील, ऍड.अजित विघ्ने, प्रशांत नवले,बागल गटाचे मकाई कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे ., अड. संतोष निकम .माजी आमदार नारायण पाटील गटाच माजी पंचायत समिती सभापती बापूसाहेब पाटील,आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक संतोष पाटीलया सर्वांनी एकत्रित येत अखेरच्या क्षणी सरपंच पदासाठी सचिन वेळेकर यांना पाठिंबा दिला आहे.

सुरुवातीला ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न झाले परंतु यातून काहीही निष्पन्न झाले नसले तरीही प्रभाग तीन व चार मात्र बिनविरोध झाले आहेत.

प्रभाग 3 मधून
बबन साळवे व
रामहरी जरांडे

प्रभाग 4 मधून
शुभांगी किघ्ने
शहाजी पाटील,
प्रशांत नवले हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत .

प्रभाग एक मधून –
भास्कर कोकणे,
शोभा कानतोडे,
सुवर्णा गुलमर,
भानुदास राऊत,
रंजना कोकणे ,
निर्मला खाटमोडे,
सुवर्णा गुलमर

प्रभाग दोन मधून
-राजलक्ष्मी मोरे पाटील,
कमल पवार,
अश्विनी कनिचे,
पूजा कनिचे,
सत्यवान निंबाळकर,
सुजित पाटील,
अमोल मोरे पाटील,
विश्वास मोरे पाटील

संरपंच पदासाठीं –
सचिन वेळेकर,
सतिष देवकते,
अमोल चव्हाण,
मच्छीद्र चव्हाण हे चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

यांनी प्रभाग एक व प्रभाग दोन मध्ये उमेदवार उभे केले असून या गटाचे सरपंच पदाचे उमेदवार सतीश देवकते हे आहेत.

हेही वाचा -मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी; तहसीलदारांना निवेदन

ऊसाला दर किती मिळणार? हे गुलदस्त्यातच! कारखाने होत आहेत गळीत हंगामासाठी सज्ज..

सध्या 11 जागापैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत व 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
आज गुरुवार (ता.26) रोजी
दोन्ही प्रमुखांनी आपल्या उमेदवारासह केत्तूरचे ग्रामदैवत श्री किर्तेश्वर, हनुमान,विठ्ठल मंदिरात आपल्या- आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
आता सरपंच कोणत्या आघाडी होणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

litsbros

Comment here