करमाळाराजकारण

मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी; तहसीलदारांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी; तहसीलदारांना निवेदन

“मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देणारे आरपीआय चे यशपाल कांबळे यांच्या अभिनंदनाचा ठराव”


(प्रतिनिधी) : ता करमाळा येथील ग्रामस्थांनी आज सर्वानूमते जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कूठल्याही राजकीय नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही अशी शपथ येथील नागनाथ मंदिरात आयोजित बैठकीत घेण्यात आली.

यावेळी उपस्थित बहुसंख्य बहुजन बांधवांनी देखील पाठिंबा दर्शविला. सदरिल आशयाचे निवेदन मा तहसिलदार, पोलिस प्रशासनास देण्यात आले.

यावेळी रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य व आरपीआय चे युवा जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

त्यांच्या या मराठा समाजाप्रतीच्या आपूलकि व बांधिलकी मूळे सकल मराठा समाज देवळाली यांचे वतीने त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव घेण्यात आला.

litsbros

Comment here