आम्ही साहित्यिकमहाराष्ट्र

****** करवली ते पाठराखीण ****** °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

****** करवली ते पाठराखीण ******
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

खरंच पाठराखीण म्हटलं की आपल्या जीवाभावाचा शब्द…किती तो आधार… किती तो आदर…काय सांगावं… गुणगान गावं…तेवढं थोडंच एका दृष्टीने विचार केला तर पाठराखीण म्हणजे कोणत्यातरी स्त्री वर्गाचा डोक्यावर किंवा पाठीवर असलेला वरदहस्त म्हणजे आशीर्वाद
… जसा की आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर असलेला तुळजापूरच्या आईसाहेबांचा आशीर्वाद आणि सदैव पाठीशी असलेली तिची शक्ती अन मग आपसुकचं मुखातून बाहेर पडतं श्री तुळजाभवानी माझी पाठराखीण……….
आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ आपल्या संस्कृतीच्या रूढी परंपरेप्रमाणे विवाह सोहळा म्हणजे दोन जीवांचीच नव्हे तो दोन घराण्याची जन्मोजन्मींची गाठ आता त्या विवाह सोहळ्यामध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी म्हणजे पार पोरगी बघण्यापासून साखरपुडा… टिळा…बस्ता…मेंदी… हळद…लग्न…रुखवत…झाल…सप्तपदी… होम… आहेर… मानपान… अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विवाह सोहळ्याचा समारोप होतो तो नवरी वाटं लावायची म्हणजे तिच्याबरोबर साधारण दोन चार दिवसासाठी तिच्या सासरी सोबत म्हणून जायचा खरा मान परंपरेप्रमाणे मावशी किंवा आत्याचा परंतु काही तांत्रिक कारणामुळे हा मान समजूतदारपणे माहेरच्या कोणत्याही स्त्रीला दिला जातो आणि त्या स्त्रीला आपण पाठराखीण असं म्हणतो
आता पाठराखीण हे पात्र आपण पाहू…

फार पूर्वीच्या काळामध्ये लहान वयात मुलींची लग्न व्हायची मग तिच्याबरोबर एखादी लग्न झालेली बहीण सोबतीला पाठवली जायची कि ही त्या नव्या नवरीला सर्व प्रकारच्या चालीरिती…रूढी… परंपरा समजावून सांगायची तिच्याकडून समजा काही चुकलं तर माहेरच्यांना बोल नको म्हणून जबाबदार अशा स्त्री व्यक्तिला पाठवलं जायचं तसंच ही व्यक्ती घरात कोण कसा आहे…कोणाशी कसं वागलं पाहिजे याबद्दल सुद्धा नव्या नवरीला टिप्स देत असायची आणि माहेरी परत आल्यावर सासरचा अहवाल आणि अपडेट द्यायची आता सुद्धा खास त्यासाठी पाठराखीण असते नवरी मुलगी सासरच्या नवीन घरामध्ये पटकन काही मागू शकत नाही घरात म्हणजे जर ती लगेच सेटल झाली तर कदाचित सासरची मंडळी अवघडून जातील म्हणून ही पाठराखीण असते
आता दुसरा विषय निघतो तो करवलीचा बहुतेक दोन्ही पात्र एकच समजतात पण ते तसं नसतं तर करवली म्हणजे पाठराखीण म्हणजे राखण करणारी असा ढोबळ अर्थ लावायला हरकत नसावी मुलीच्या बघाबघीच्या कार्यक्रमापासून ते तांदूळ पडेपर्यंत तिचं सगळं बघणारी…करणारी तिची सखी मैत्रीण किंवा नात्यातली बहिणी समान असणारी स्त्री किंवा मुलगी ह्याला खरंतर करवली म्हणतात नवऱ्या मुली बरोबर हिला पाठवायची सुद्धा पद्धत आपल्या जन्मा अगोदर पासूनची असावी कारण मी लहान असल्यापासून पाठराखीण किंवा करवली हे पात्र पाहत आलोय आणि अजूनही पाहतोय तिला का पाठवलं जातं याचं शास्त्रात काय कारण आहे हे काय कोणाला माहित नाही पण जी कॉमन कारणं आहेत ती जाणकारांना माहित आहेत परंतु ती कारणं शोधण्यापेक्षा त्यांच्यातल्या गमती जमती पाहणं खूप मजेशीर आहे ही प्रथा आजही चालू आहे खेड्यापाड्यामध्ये तरी ह्या करवलीला खूप मान आहे एकदा का मुलीचं लग्न ठरलं की हिला पण करवली म्हणून फिक्स करून टाकतात मग ही ताई तयारीला लागते.


शक्यतो रिकामटेकडी… मोकळी ढाकळी निवांत असलेली…ही बया नवऱ्या मुलीच्या मर्जीतली असते नवऱ्या मुलीचं सगळं बघणारी ही करवली पण लग्नकार्यात भाव खाऊन जाते कित्येकजणीचं आणि ह्या असल्या शायनिंगच्या गडबडीत जमतं हातभर गजरा अन गावभर नजरा या टाईपच्या पण करवल्या क्वचित प्रसंगी बघायला मिळतात कारण नवरीपेक्षा काही अंशी त्या ऍक्टिव्ह वाटतात पूजाविधीच्या यावेळी ब्राह्मण गुरुजींच्या हाताखाली करणारा नवऱ्या मुलीचा खरं तर तो प्रतिनिधी गुरुजी जर म्हणाले मुली तुझं नाव काय तर ते पण करवलीच पटकन नवरीच्या अगोदर कल्पना असं नाव सांगते काही जणी या चाललेल्या कार्यातच आपलं सूत जुळवतात खरं तर मुलगी लग्न होऊन ज्या घरात जाणार असते त्या घरातील लोकांविषयी ती अनभिज्ञ असते तिथल्या चालीरीती… वातावरण…लोकांचे स्वभाव…तिथले दळणवळण…संस्कार…घर कामाची पद्धत…नियम ह्याविषयी तिला काहीही माहीत नसतं ही माहिती मिळवावी ती धीट धाडसी व्हावी तिला न समजणाऱ्या गोष्टी समजावून दाखवून तिला तिथं मार्गी लावण्याची जबाबदारी ही त्या करवलीची असते म्हणून काही वेळा मुली बरोबर करवली पाठवतात सासूशी कसं बोलावं… कसं वागाव…सगळ्यांच्या नजरा कशा झेलाव्यात याचबरोबर मित्र रुपी पुजाऱ्यांनी घेरलेल्या तिच्या त्या दैवताला कमीत कमी त्या दैवताला मेसेजिंग करून मुखदर्शन तरी व्हावं या हेतूने दोघांमध्ये दुवा साधण्याचं पवित्र कार्य ती करवलीच करत असते.

हेही वाचा – ** एक आठवण… वल्ली भेळ ** ~~~~~~~~~~~~~~~~

….. बाजार आमटी ……

सत्यनारायण…कुलदैवत…जागरण गोंधळ बोकडाचं जेवण झालं की मुलीची पाठवणी होते त्यावेळी करवलीला नाही तर पाठराखीणीला साडी चोळीचा मान करतात तिथला रिकामा मुराळी घेऊन मग त्या माहेरी येतात इथे करवलीची जबाबदारी संपते मुलगी आपसूकच संसाराला लागते त्यात करवलीचं योगदान मोठ्ठ असतं पण आजकालच्या मुलींना करवली लागत नाही त्यांना करवली म्हणजे एक प्रकारची अडचण…डिस्टर्ब वाटतो कारण काय करायचं आहे हे त्यांना ऍडव्हान्स मध्ये माहीत असतं त्यामुळे दुसऱ्या दिवशीच त्या पदर खोचून कामाला लागलेल्या मी पाहिल्यात परफॉर्मन्स दाखवायचा असतो खऱ्या अर्थाने बघितलं तर करवली म्हणजे करा म्हणजेच कलश आणि वली म्हणजे तो धारण करणारी असं सूत्र समजू कारण लग्नाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे सतत त्याच्यासोबत मंगल प्रतीक म्हणून जे ताट असतं त्याच्यात दिवा…हळद-कुंकू वगैरे असतात पूर्वी कलश पण असायचा वास्तविक मराठी भाषेमध्ये जसं नवऱ्याला नुसतं नवरा नव्हे तर नवरदेव म्हणतात मग जिथं देव शब्द तिथं मान ही तेवढाचं लग्नात वधूवरांना जणू काही स्विय सहाय्यक म्हणजे असिस्टंट आलेच म्हणून करवली असायची पण अजूनही काही ठिकाणी असतात किंवा नसतात पण आणि ह्या लग्न सोहळ्यामध्ये मुलीचे मामा आणि नवरी सोबत करवली दोघांची बरोबरी कोणीच करू शकत नाही

***************************************
… किरण बेंद्रे
… पुणे
… 7218439002


………………..

litsbros

Comment here