करमाळ्यात बूद्धिबळ स्पर्धेने आजपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवास प्रारंभ
करमाळा(प्रतिनिधी): येथील शिव फूले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समिती च्या वतीने बूद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात सुरु करण्यात आली.या स्पर्धेच्या निमित्ताने जयंती महोत्सवाची सुरुवात देखील झाली आहे.
यंदा सोलापूर पॅटर्न जयंती चे हे दुसरे वर्ष असून यंदा जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे.
यशकल्याणी सेवा भवन येथे करमाळा चेस असोसिएशन,तसेच नागेशदादा कांबळे मित्र परिवार यांचे सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल असोसिएशनचे सचिन साखरे, प्रा नागेश माने, नगरसेवक पप्पू सावंत, दिपकराव ओहोळ, लक्ष्मणराव भोसले, यशपाल कांबळे उपस्थित होते. गणेश करे पाटील यांनी उदघाटन केले.
नागेश दादा कांबळे यांनी स्पर्धकांचे स्वागत करून शूभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी प्रसेनजीत कांबळे,भिमराव कांबळे सर,इ नी परिश्रम घेतले.
शिव फूले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने उद्या 10/04/23 रोजी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान डाॅ बाबासाहेब आंबेडकर पूतळा येथे संध्याकाळी 8 वाजता तसेच 13 तारखेला राज्यस्तरीय डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर 14 तारखेला भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सर्व बहूजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे संस्थापक-नागेश दादा कांबळे यांनी केले आहे.
Comment here