करमाळाक्राइम

करमाळा तालुक्यातील उमरड येथे एका रात्रीत चार घरफोड्या झाल्याने खळबळ!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील उमरड येथे एका रात्रीत चार घरफोड्या झाल्याने खळबळ!

उमरड(प्रतिनिधी): उमरड ता. करमाळा येथे काल पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास चार ठिकाणी घरफोड्या झाल्या. दाराचे कोयेंडे तोडून चोरांनी घरात प्रवेश करून चोरी केली.चारही प्रकारच्या घरफोड्या समान पद्धतीने झालेच दिसून आले. वस्तीवर राहणाऱ्या बाळू इंगळे यांच्या घरी चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरांचा अंदाज घरातील लोकांना आला व आरडाओरडा सुरू होताच चोरांनी पोबारा केला. त्यानंतर हपिजा सयद यांच्या घरात घुसून चोरांनी रोख रक्कम,साड्या, व दागिने चोरले.

त्यानंतर आज्जीज शेख यांची मोटारसायकल घेऊन चोर मेन रस्त्याने आले व इरफान शेख यांच्या दारात गाडी उभी केली. त्यानंतर शब्बीर शेख यांच्या दोन रूमच्या कड्या तोडून घरात घुसले व शेजारील रूमला बाहेरून कडी लावून बंद केले. पुढे छगन वलटे यांच्या घरावर बांधकामाचे बीम सीडी म्हणून वापरून चोर जिन्याच्या मार्गे आत उतरले व त्यांच्या कापड दुकांची कडी तोडण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यात घर मालक नंदकिशोर वलटे हे जागे झाले व त्यांनी आरडाओरडा सुरू केला.

याचा अंदाज येताच चोरांनी पळ काढला.सकाळी जेऊर पोलीस स्टेशनचे अधिकारी पो हे कॉ चेतन पाटील, चंद्रकांत ढवळे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन सदर प्रकरणाची चोकशी करून गुन्ह्याची नोंद केली.पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. तसेच संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळून आल्यास नागरिकांनी लगेच पोलीस स्टेशन अथवा गावचे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

litsbros

Comment here