करमाळा

करमाळा तालुक्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या; करमाळा पोलिसांत फिर्याद दाखल 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या; करमाळा पोलिसांत फिर्याद दाखल

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथील शेतकरी नसीर ईलाही पठाण वय 60 या शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून अखेर शेतातील पिकात फवारण्यात येणाऱ्या तणनाशक औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.

याबाबत करमाळा पोलिसांत सात संशयित आरोपींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश केरबा हंडे, महादेव अंकुश हंडे, सुदंर अंकुश हंडे तिघे रा वरकुटे ता.करमाळा प्रविण भारत
खोचरे रा.कन्हेरगाव तालुका माढा तसेच विजय ढोबळे,सागर ढोबळे,बाळासाहेब ढोबळे
तिघेही रा.भोगेवाडी ता.माढा असे आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याची फिर्याद मयताचा मुलगा अझरुद्दीन नासीर पठाण (वय 25) रा.पठाण वस्ती वरकुटे मूर्तीचे यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे.
याबाबतची हकीकत अशी की नासीर पठाण यांचे गावातील अंकुश हंडे यांचे पहिल्यापासूनच जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रापंचिक अडचणीने नासीर पठाण यांनी अंकुश हंडे यांनी व्याजाने पैसे देऊ मात्र शेत नावावर खरेदी देण्यास सांगितले. त्यामुळे पठाण यांनी शिवारातील आजोबाच्या नावावरील साडेपाच एकरापैकी शेतजमीन अंकुश हंडे यांना उसनवारी पैशावर 26 आक्टोबर 2015 रोजी दिली.

दोन लाख रूपये घेऊन दिड एकर (60 आर) जमीन तिन टक्के मासिक व्याज दराने व्याजाने पैसे घेऊन अंकुश हंडे यांची पत्नी सुदंर हंडे यांच्या नावाने परतीच्या बोलीवर घाण ठेऊन खरेदी नासीर पठाण यांनी दिली होती. त्यातच पुन्हा पठाण कुटुंबियांना पुन्हा पैशाची गरज भासल्याने 14 जानेवारी 2016 रोजी त्यांनी अंकुश हंडे यांच्या कडून 36 आर जमीन एक लाख रूपये घेऊन व्याजाने परत बोलीवर घाण ठेऊन सुदंर हंडे यांच्या नावाने खरेदी दिली होती.

मात्र पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने दुष्काळी परिस्थिती व सततच्या नापिकीने पैसे फेडून वडिलोपार्जित जमीन परत खरेदी घेणे नासीर पठाण यांना जमत नव्हते अशावेळी अंकुश हंडे, महादेव हंडे , सुदंर हंडे यांनी सतत पैशाची मागणी करून त्यांना जेरीस आणले होते.

व्याजाचे पैसे देऊनही वारंवार शिविगाळ, दमदाटी देणे, अपमान करणे चालू होते. अशावेळी अंकुश हंडे यांनी परस्पर ही जमीन भोगेवाडीच्या ढोबळे यांना काहीही न सागंता विक्री केली. 20 तारखेला सर्व संशयित आरोपीं ही पठाण कुटुंबियांच्या ताब्यात असलेली व ते शेतात कसत असलेल्या शेतात आले.

त्यांनी पत्नी वहिदा यांच्या समोर अपमान करून शिविगाळ केली जिवंत मारण्याची धमकी दिली व तेथून हाकलून लावण्यासाठी येथून निघून जा म्हणून दमदाटी करून अपमानास्पद वागणूक दिली . त्यामुळे निसार पठाण यांनी 20 फेब्रुवारी रोजी घरात पिकात तणनाशक फवारणीचे औषध प्राशन केले.

त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पठाण यांना कुर्डूवाडी येथील डाॅ. साखरे यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याकरिता दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची अखेर दिनांक 23 फेब्रुवारी रोजी खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथील नसीर पठाण हे शेतकरी आहेत. अल्पभूधारक शेतावर ते कसेबसे शेती करीत आपले उपजीविका चालवीत होते. खाजगी सावकाराच्या वेळोवेळी शिवीगाळ व असह्य जाचास कंटाळून त्यांनी आपले जीवन संपवले श्री पठाण यांनी विष घेतल्यानंतर त्यांना कुर्डूवाडी येथील डॉ. साखरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तेथेच त्यांना उपचार घेत असताना मरण आले.

मृत शेतकरी नसीर ईलाही पठाण

नसीर पठाण यांनी वरकुटे मूर्तीचे येथील अंकुश हांडे नामक या खाजगी सावकाराकडून स्वतःच्या मुलीच्या लग्नाकरिता तीन लाख रुपये घेतले होते त्या बदल्यात पठाण यांनी हांडे यांच्याकडे आपली स्वतःची जमीन घाण ठेवली होती सावकारांना वेळोवेळी व्याजाचा परतावा श्री पठाण करत होते तरीदेखील श्री हांडे हे त्यांना असह्य त्रास देत होते.

खाजगी सावकार हे व्याजावर व्याज लावून श्री पठाण यांना वेळोवेळी त्रास देण्याचे काम करीत होते .त्यामुळे नासीर पठाण यांचे मानसिक संतुलन बिघडले होते शेवटी सावकाराच्या वेळोवेळी होणाऱ्या जाच कंटाळून नासीर पठाण यांनी विषारी औषध घेतले यानंतर पठाण यांना कुर्डूवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ते शेवटी मरण पावले याबाबत ते मयत होताच त्यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत सावकारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मयताचे दफन विधी करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर करमाळा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून घेतला असल्याचे अझरुद्दीन यांनी सांगितले.

या घटनेबाबत करमाळा पोलिसांनी वेळीच गांभीर्याने दखल घेतली असती तर माझ्या वडिलांचे प्राण वाचले असते मी व माझे वडील वेळोवेळी करमाळा पोलीस स्टेशनची सावकाराच्या त्रासाबद्दल तक्रार देण्यासाठी आलो असता करमाळा पोलिसांनी आमची कसलीही दखल घेतली नाही त्यामुळेच आमच्या वडिलांचा निष्पाप जीव गेला असा गंभीर आरोप मयताचा मुलगा अझरुद्दीन पठाण यांनी सागितले.दरम्यान करमाळा पोलिसांत सातही संशयित आरोपींच्या विरोधात नासीर पठाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकरी प्रतिबंधक अधिनियम 39,45,46 , 504, 506,34 आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसुन संशयित आरोपी फरार झाल्याचे वृत्त आहे. याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप हे करत आहेत.

litsbros

Comment here