करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील जेऊर, चिखलठाण, गौंडरे यासह १३ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश; वाचा, कोणत्या ग्रामपंचायतीवर कोण आहे प्रशासक?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील जेऊर, चिखलठाण, गौंडरे यासह १३ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश; वाचा, कोणत्या ग्रामपंचायतीवर कोण आहे प्रशासक?

करमाळा(प्रतिनिधी); कार्यकाळ संपल्यानंतर मुदत संपलेल्या करमाळा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या आदेशामुळे या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नियुक्त केले जाणार असून गावातील कारभाऱ्यांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका साधारण जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.

मुदत संपलेल्या १३ ग्रामपंचायती पुढीप्रमाणे –
राजुरी, चिखलठाण, जेऊर, गौंडरे, उंदरगाव, कोर्टी, निंभोरे, केत्तूर, कंदर, रामवाडी, घोटी, भगतवाडी, वीट या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे.

दरम्यान करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या

जेऊर व भगतवाडी ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोजकुमार म्हेत्रे यांची नियुक्ती झालेली आहे.

राजुरी ग्रामपंचायतीवर कृषी अधिकारी डी. आर.सारंगकर,
चिखलठाण ग्रामपंचायतवर मुख्याध्यापक व्ही.व्ही.वाघमारे,
गौंडरे ग्रामपंचायत वर विस्तार अधिकारी ए.डी. थोरात,

उंदरगाव ग्रामपंचायतवर एम.डी म्हेत्रे,
कंदर ग्रामपंचायतवर विस्तार अधिकारी(कृषी) टी. जी. साठे,

कोर्टी ग्रामपंचायतवर केंद्रप्रमुख आदिनाथ देवकाते,

निंभोरे ग्रामपंचायतवर विस्तार अधिकारी कृषी टी.जी साठे तर

केतुर ग्रामपंचायतवर विस्ताराधिकारी एम.डी म्हेत्रे,
वीट ग्रामपंचायतवर कृषी अधिकारी डी आर सारंकर,

रामवाडी ग्रामपंचायत वर विस्तार अधिकारी एम.डी.म्हेत्रे,

घोटी ग्रामपंचायत वर विस्तार अधिकारी(कृषी) टी.जी.साठे यांची प्रशासक नेमणूक केली आहे.

litsbros

Comment here