आरोग्यकरमाळामाणुसकी

निंभोरे येथे आर.व्ही.ग्रुपचा सामाजिक उपक्रम व वचनपूर्ती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निंभोरे येथे आर.व्ही.ग्रुपचा सामाजिक उपक्रम व वचनपूर्ती

 करमाळा (प्रतिनिधी ):  रविवार दि.3 सप्टेंबर 2023 रोजी आर.व्ही.ग्रुप यांचे वतीने बुधरानि हॉस्पिटल पुणे यांचे मार्फत मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

     आज त्यामधील 35 लोकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधराणी हॉस्पिटल पुणे येथून बस आली आणि निंभोरे येथून लोकांना घेऊन गेली.

      रविदादा वळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे निंभोरे गावाला मोफत सेवा व सुविधांचा लाभ घेता येत आहे . शासकीय व निमशासकीय तसेच सामाजिक उपक्रम यांचा लाभ गावातील ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी रविदादा वळेकर यांच्या माध्यमातून सतत कामाचा झपाटा दिसून येत आहे.

    आज आर.व्ही.ग्रुप च्या माध्यमातून रविदादा वळेकर यांनी वचनपूर्ती करत लोकांना डोळ्याच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल येथे पाठवून दिले. तसेच या लोकांची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉस्पिटल कर्मचारी यांना दिल्या.या लोकांना पाणी, नाष्टा व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

  रविदादा वळेकर यांनी आलेल्या बस चालक व एक सिस्टर व एक कर्मचारी यांचा आपल्या गावाच्या वतीने सन्मान केला.तसेच बस ची पूजा करून,श्रीफळ फोडून बस पुणे च्या दिशेने रवाना झाली.

litsbros

Comment here