करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

दहा हजारांची लाच घेताना करमाळ्यात कृषी पर्यवेक्षकाला रंगेहात पकडले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दहा हजारांची लाच घेताना करमाळ्यात कृषी पर्यवेक्षकाला रंगेहात पकडले

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा शहरात दहा हजार रुपयाची लाच घेताना करमाळा कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यांना आज रंगेहात पकडण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीच्या नावे शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर अनुदानावर पॉवर टिलर मिळवण्यासाठी अर्ज केला होता त्याबाबत तक्रारदार यांना पूर्व संमती मिळाली.

त्यानंतर त्यांनी पावर टिलर खरेदी करून सर्व कागदपत्रे लोड केली परंतु पडताळणी रिपोर्ट हा कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यांनी द्यावयाचा होता परंतु त्यांनी तो रिपोर्ट दिला नाही सदरचा रिपोर्ट देण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कुंभार पर्यवेक्षण अधिकारी यांच्यासह सापळा रचून प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांनी करमाळा सापळा लावला त्यानुसार तक्रार दाराकडून दहा हजार रुपये घेताना कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यास लासलुजपत प्रतिबंधक विभागाने रंगीहात पकडले.

हेही वाचा – ऊसबिलासाठी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्या मकाई अन बागलांच्या गलथान कारभाराविरोधात पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे होणार बेमुदत हलगी नाद आंदोलन; वाचा सविस्तर

ब्रेकिंग; करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘या’ संचालकांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

या कामे करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला जात आहे याप्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद पकाले पोलीस कॉन्स्टेबल गजानन किनगी चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी या कारवाईस भाग घेतला होता.

litsbros

Comment here