करमाळामाणुसकीशैक्षणिक

फिसरे येथे पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हाल; शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठान तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जारची सोय

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

फिसरे येथे पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हाल; शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठान तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जार ची सोय

करमाळा (प्रतिनिधी); फिसरे जिल्हा परिषद शाळेमधील  बोरचे पाणी कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर गावातील शिव साम्राज्य युवा प्रतिष्ठान तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रोज पाच पिण्याच्या पाण्याची जारची सोय करण्यात आली.

 या कौतुकास्पद कार्याबद्दल जिल्हा परिषद शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत फिसरे तसेच फिसरे ग्रामस्थ यांच्याकडून शिव साम्राज्य युवा प्रतिष्ठान चे कौतुक करण्यात आले.

तसेच शिवसम्राज युवा प्रतिष्ठान ने देखील आम्ही असेच सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. 

litsbros

Comment here