करमाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बांधकामासाठी ‘इतका’ निधी मंजूर; आ.संजयमामा शिंदे यांनी दिली माहिती
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा येथे दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयाच्या बांधकामासाठी 1 कोटी 69 लाख 18 हजार 705 रुपये निधी मंजूर झाला असून सदर इमारतीच्या बांधकामासाठी आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, करमाळा येथील सर्वच प्रशासकीय कार्यालयांच्या इमारती मोडकळीस आलेल्या असून करमाळा येथे सर्व शासकीय कार्यालयांचे एकत्रित करण करून त्याच्या प्रशासकीय संकुल बांधकामासाठी आपण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे 25 कोटी रुपये निधीची मागणी केलेली असून त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. भविष्यकाळामध्ये प्रशासकीय संकुलाची इमारत उभी राहील.तत्पूर्वी सहाय्यक निबंधक कार्यालयाची इमारतही मोडकळीस आलेली होती.
त्यासाठी आपण स्वतंत्रपणे निधीची मागणी केली होती त्यानुसार सदर निधी मंजुरीची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्यामुळे लवकरच सहाय्यक निबंध कार्यालयाचे बांधकाम सुरू होईल.
आत्तापर्यंत आपण करमाळा शहरामध्ये करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 25 कोटी रुपये तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून त्याचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे तसेच करमाळा शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी नगरपरिषदेची इमारत, सांस्कृतिक सभागृह व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यासाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर आहे.
त्याची बांधकामेही लवकरच सुरू होतील.करमाळा शहरांमध्ये आपल्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत बांधकामासाठी तब्बल 55 कोटी निधी मंजूर झालेला आहे व त्या माध्यमातून बांधकामेही सुरू आहेत.
तसेच करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या कमला भवानीच्या परिसर विकासासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला होता त्यामधून विविध बांधकामे सुरू आहेत.
एकूणच करमाळा शहराचा व परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे.
Add Comment