शहीद हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा; करमाळा तहसीलदारांकडे निवेदन
करमाळा (प्रतिनिधी);
पुणे शहरातील दत्तनगर भागातील एका माथेफिरू तरुणाने शहीद हजरत टिपू सुलतान याच्याबद्दल अश्लील शिवीगाळ करून त्या महान पुरुषाची बदनामी केली तेव्हा त्या माथेफिरोवर त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी करमाळा येथील शहीद हजरत टिपू सुलतान सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांनी एका निवेदनाद्वारे गृहमंत्री मंत्रालय मुंबई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की पुणे शहरातील दत्तनगर भागात स्वातंत्र्य सेनानी शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमानजनक शब्द वापरून त्यांची विटंबना करून समस्त मुस्लिम समाज आणि अनेक भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या त्या व्यक्ती विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या शेवटी केली आहे.
सदर माथेफिर व्यक्तीवर त्वरित कारवाई करावी अन्यथा निषेध मोर्चा काढू असा इशारा शहीद हजरत टिपू सुलतान सामाजिक बहुउद्देशीय संस्था तसेच करमाळा मुस्लिम जमात यांच्या वतीने निवेदनाच्या शेवटी दिला आहे.
निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी करमाळा पोलीस निरीक्षक तहसीलदार करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शहीद हजरत.टिपु सुलतान बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष – सुफरान शेख आणि शहीद हजरत टिपु सुलतान बहुउद्देशीय सामाजिक संस्था सचिव – अफजल शेख, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी युवा सेनेचे जिल्हा सचिव – पै.सोहेल पठाण, अल सहारा ग्रुपचे अध्यक्ष – तोफिक शेख, मुस्तकीम पठाण, पै. अमीन बेग, युसुफ शेख, अमर शेख, शाहरुख नालबंद, अजीम पठाण, भैय्या पठाण, राजू पठाण, साजिद (बिल्डर) तांबोळी, नाजीम खान, अबू बागवान, शाहरुख शेख, मोहिदिन बागवान, आणि इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comment here