महाराष्ट्र

दोन खासगी बसेसची समोरासमोर धडक; ६ जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 दोन खासगी बसेसची समोरासमोर धडक; ६ जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

बुलढाणा जिल्हातील मलकापूर येथे दोन खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती झालेल्या या भीषण अपघातात दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकल्या असून या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हलचा समोरासमोर धडकल्याची घटना आज सकाळी तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाण पुलावरती घडली. या धडकेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर 25 ते 30 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

सहा जणांचा जागीच मृत्यू

एम.एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 35 ते 40 तीर्थयात्री प्रवास करत होत. तर नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. दरम्यान मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक 6 वरती समोरासमोर धडक बसल्याने या बसेसचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही बस चिरडल्याचे पाहायला मिळाले. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते 20 ते 25 प्रवासी जखमी आहेत.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सीचे पोलीस निरीक्षक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

litsbros

Comment here