करमाळाराजकारण

केत्तूर मध्ये 74 % मतदान; निकालाकडे लक्ष, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूर मध्ये 74 % मतदान; निकालाकडे लक्ष, वाचा सविस्तर

केत्तूर ( अभय माने); करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुकाना रविवार (ता.5) रोजी सकाळी 7.30 पासून सुरुवात झाली. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात सायंकाळी.5.30 वाजता मतदानप्रकिया पार पडली असून नूतन कारभार्याचे भवितव्य आता मशिनमध्ये बंद झाले.

      केत्तूर ता.करमाळा येथे प्रभाग .3 व 4 म मधिल निवडणुक अविरोध पार पडली असलीतरी प्रभाग 2 व 3 मध्ये 6 जागांसाठी 10 उमेदवार असल्याने अपक्ष बाजी मारणार की कुणाला महागात पडणार ? हे मात्र सोमवार (ता.6) रोजी कळणार आहे. पेथे संरपंच पदासाठी चौरंगी सामना होत आहे आज 74 मतदान झाले.

     मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना खुष करण्यासाठी मटण, मासे, दारु या बरोबरच काही ठिकाणी पैशाचे वाटप करण्यात आलेची चर्चा आहे. मतदारांच्या घरी जाऊन मत दाराना पेसे वाटप केल्याने काही मतदारांची दिवाळी दिवाळीच्या अगोदरच दिवाळी झाली तर काहींथी दिवाळी जोरात होणार आहे.सर्वसामान्यांसाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे.

  प्रभाग 1 मध्ये 1160 पैकी 1067

  प्रभाग 2 मध्ये 864 पैकी 710 तर

फक्त सरपंच पदासाठी 

  प्रभाग 3 695 पैकी मध्ये 462

  प्रभाग 4 मध्ये 728 पैकी 314 एवढे मतदान झाल आहे

एकूण मतदान 3447 पैकी 2553 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

litsbros

Comment here