करमाळाराजकारण

राजुरी ग्रामपंचायत तिरंगी होण्याची शक्यता; शिंदेगटात वाढते इच्छूक, बंडखोरीचा फायदा पाटील गटाला होणार का? वाचा सविस्तर आढावा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजुरी ग्रामपंचायत तिरंगी होण्याची शक्यता; शिंदेगटात वाढते इच्छूक, बंडखोरीचा फायदा पाटील गटाला होणार का? वाचा सविस्तर आढावा

केतूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवारी वरुन जोरदार रस्सीखेच पहायला मिळत असून यामध्ये प्रामुख्याने संजयमामा शिंदे गटात इच्छूकांची संख्या अधिक असल्याने कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागाचे लक्ष लागले आहे.

तर पाटील गटामध्ये राजेंद्र भोसले यांच्या पत्नी यांच्या उमेदवारीवरुन एकमत झाल्याचे समजत आहे. शिंदे गटात सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने ऐनवेळी शिंदे गटात बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.परिनामी बंडखोरीचा पाटील गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सरपंचपदाची उमेदवारी निश्चित करण्यासाठी शिंदे गटाचा कस लागणार आहे.

करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुका म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रंगीत तालीम असणार आहे.

 

राजुरी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदासाठी 34 तर सरपंच पदासाठी 8 अर्ज दाखल झाले आहेत.राजुरी येथे शिंदे गट,पाटील गट, बागल गट, प्रमुख कार्यकर्ते आहेत. 

शिंदे गटात गावातील प्रमुखांची जास्त संख्या आहे.जगताप गटाचेही येथे कार्यकर्ते आहेत मात्र खरी लढत पाटील व शिंदे यांच्याच गटात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. येथे तिरंगी लढत होऊ शकते अशीही राजकीय चर्चा आहे.

रेवन्नाथ साखरे,श्रीकांत साखरे ,उदय साखरे,अमोल दुरंदे हे आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक आहेत तर राजेंद्र भोसले,गणेश जाधव हे मा.आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत.

अमोल दूरंदे यांनी मागील पंचवार्षिक निवडणूकीत बागल गटाचे रेवन्नाथ साखरे यांचा पराभव केला होता.त्यानंतरच्या काळात रेवन्नाथ साखरे यांनी बागल गटाला राम राम करत शिंदे गटात प्रवेश केला.

मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट रेवन्नाथ साखरे यांना उमेदवारी देनार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.श्रीकांत साखरे यांनी यावेळी गावपातळीवरील तडजोडीत शिंदे गट देईल त्या उमेदवाराचे काम करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे

तर अमोल दुरंदे हे पंचायत समितीच्या शब्दावर शिंदे गटासोबत राहण्याची शक्यता आहे. एकास एक लढत झाल्यावर शिंदे गटाच्या उमेदवाराला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. 

या सर्व शक्यता न घडल्यास ऐन वेळी तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे,असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

litsbros

Comment here