करमाळा

युनायटेड जनता दलाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी करमाळा येथील ॲड आजिनाथ शिंदे यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

युनायटेड जनता दलाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी करमाळा येथील ॲड आजिनाथ शिंदे यांची निवड

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट आजिनाथ रघुनाथ शिंदे यांची युनायटेड जनता दलाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे सदर निवडीचे पत्र राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील व तसेच राज्याचे अध्यक्ष शशांक राव यांनी एका पत्रकाद्वारे त्यांची निवड केली आहे.

एडवोकेट आजिनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की देशाला समाजवादी व धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडवणे साठी आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

 भविष्यात आदरणीय नितीशजी कुमार साहेब यांची देशात तर राज्यात आमदार कपिल पाटील यांचीच सत्ता येणार आहे असे नवनिर्वाचित उपाध्यक्ष एडवोकेट आजिनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले त्यांच्या माध्यमातून आम्ही राज्यभरात जनतेच्या हिताचे काम करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

 एडवोकेट आजिनाथ शिंदे यांनी आजपर्यंत करमाळा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष, लोकभारती चे प्रदेशाध्यक्ष, तसेच छात्र भारतीचे राज्य कार्यकारी अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली आहेत त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांची युनायटेड फ्रंट जनता दलाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे करमाळा तालुक्या मधून विशेष अभिनंदन होत आहे.

litsbros

Comment here