*करमाळा तालुक्यात थंडीचा जोर झाला कमी*
केत्तूर (अभय माने) संपूर्ण करमाळा तालुक्यात मागील आठवड्यात भरपूर हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा जोर एकदम कमी झाला आहे. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊसही झाला आहे. दिवसभर अधून मधून ढगाळ वातावरणामुळे थंडीची लाट ओसरल्याचे चित्र अनुभवास येत आहे.तर ढगाळ वातावरणामुळे उत्साह संपला आहे निरुत्साही वातावरण दिवसभर अनुभवावे लागत आहे.
हेही वाचा – करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात करा; माजी नगरसेविका सविता कांबळे
महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी
आठवडाभरापूर्वी उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला होता परंतु ढगाळ वातावरणामुळे शितलहरी ओसरल्या आहेत त्यामुळे थंडीचा जोर एकदम कमी झाला आहे.रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी मात्र थंडीची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.तमिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.