करमाळा

निंभोरे येथे शिवजयंती उत्साहात साजरी; चिमुकलीच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निंभोरे येथे शिवजयंती उत्साहात साजरी; चिमुकलीच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन

निंभोरे(प्रतिनिधी); 19 फेब्रुवारी रोजी दरवर्षी प्रमाणे निंभोरे या गावात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी हा उत्सव खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.लहान चिमुकल्यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार घालून तसेच “जय जिजाऊ जय शिवराय” असा गजर करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

मुलींचे महत्त्व वाढवण्यासाठी गावातील चिमुकली शिवकन्या कुमारी प्रणिता भैरू वाघमारे या लहानगीच्या हस्ते शिवजनमोत्सव साजरा करण्यात आला.

निंभोरे गावाने या निमित्ताने एक सामाजिक संदेश दिला आहे.”मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही त्या दिव्याची पंती आहे” हे या निमित्ताने जाणवून दिले आहे.

इतर खर्चाला फाटा देत अगदी साध्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रतिष्ठान चे संस्थापक रविदादा वळेकर,धनंजय वाघमारे,विकास दळवी,भाऊसाहेब वाघमारे,दशरथ वळेकर,महादेव वळेकर,अभिजित वळेकर,

अक्षय वळेकर,ऋषिकेश वळेकर,भैया ढाले, अनिकेत वळेकर, महेश वाघमारे,आनंद फाटके,प्रमोद काळदाते,सौरभ जमदाडे,दादा पाटील,सागर फरतडे, विशाल फरतडे,रामभाऊ फरतडे,तात्या दळवी,बबलू ढाले, विजय वळेकर, विशाल वाघमारे,श्रीराम कन्हेरे,मोण्या करे आदी शिवभक्त उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय वाघमारे,ऋषिकेश वळेकर, भैरु वाघमारे,अनिकेत वळेकर,अभिजित वळेकर,तात्या दळवी आदी शिवभक्त यांनी प्रयत्न केले.

litsbros

Comment here