करमाळा

करमाळा तालुक्यात पुन्हा दिसला बिबट्या; नागरिकांत घबराटीचे वातावरण, वाचा सविस्तर 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात पुन्हा दिसला बिबट्या; नागरिकांत घबराटीचे वातावरण, वाचा सविस्तर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मांगी पोथरे परिसरात आज बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने शेतकरी वर्गामध्ये एकच खळबळ माजली आहे मांगी येथील प्रकाश माळी या शेतकऱ्याला बिबट्या दिसला असल्याचे प्रत्यक्ष त्यांनी पाहिले आहे व तसे त्या पद्धतीचे त्याने व्हिडिओ शूटिंग देखील केली आहे मांगी ता. करमाळा) येथील शेतकरी प्रकाश माळी यांना मांगी पोथरे रस्त्यावरील आनंद बागल यांच्या शेताजवळ शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या दिसला.

ते आपल्या शेतातील लिंबू विक्रीसाठी पिकअप या चार चाकी वाहनाने पोथरे येथे जात असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी त्यांनी मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून घेतले.

करमाळा तालुक्यातील मांगी, पोथरे, जातेगाव, कमोने, वडगाव या शिवारात गेल्या चार दिवसांपासून सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वन विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष आहे. अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. पण आज करमाळा वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी त्या शेतात जाऊन ठसे पाहणी करून सदर प्राणी बिबट्याचं असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

वडगाव शिवारातील शेळीवर केलेला हल्ला या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. तो हल्ला बिबट्याचा नाही, परंतु आजच्या व्हिडिओ मधील बिबट्या हाच प्राणी आहे. संध्याकाळ झाल्यामुळे आज प्रत्यक्ष येऊन पाहणी केली नाही. उद्या सकाळी येऊन पाहणी करून पुढील निर्णय घेऊ तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी.

सुरेशकुरले

वनरक्षक, मोहोळ वनविभाग

मी पोथरे येथे लिंबू विक्रीसाठी जात असताना आनंद बागल यांच्या शेताजवळ एक बिबट्या अचानक माझ्या गाडी समोरून रस्ता पार करून गेला. मी स्वतः बिबट्या पहिला असून याचा वन विभागाने लवकर बंदोबस्त करावा. तसेच परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी.

प्रकाश माळी

प्रत्यक्षदर्शी, शेतकरी

 

गेल्या आठवड्यात मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेळ्या शेतात चरत असताना बिबट्याने हल्ला करून फस्त केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली व तुमची शेळी बिबट्याने नाही तर तरस या प्राण्याने खाल्ली असल्याचे सांगून निघून गेले.

 

अशोक कामटे,

शेतकरी, जातेगाव

https://youtube.com/shorts/ogICnS-2qdw?feature=share

मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी ही वडगाव (ऊ) शिवारात अशोक कामटे या शेतकऱ्याची शेळी बिबट्याने खाल्ली होती. त्यानंतर त्याच दिवशी अजित जाधव या शेतकऱ्याला ही बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन संबधित ठसे बिबट्याचे नाहीत असे सांगून वेळ मारून नेली.

दोन दिवसांपूर्वी कामोने येथील काही मजूर महिलांनीही बिबट्या पहिला होता. परंतु याकडे अफवा म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्या मनुष्यचा बळी गेला तरच वनविभाग सावध होईल का..? अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. गिरी दोन ते तीन वर्षांपूर्वी बिबट्याचे वांगी मांजरगाव परिसरात दर्शन झाले होते तसेच या बिबट्याने नाहक एका शेतकऱ्यांचा बळी घेतला होता त्याच्यानंतर दोन ते तीन वर्षानंतर आज मांगी शिवारात बिबट्या दिसल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

litsbros

Comment here