करमाळा

जिंती जवळ रेल्वे मालगाडीचे कपलिंग तुटल्याने गाडीचे दोन भाग; इतर प्रवासी गाड्या अडीच तास लेट, प्रवाशांचे हाल 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिंती जवळ रेल्वे मालगाडीचे कपलिंग तुटल्याने गाडीचे दोन भाग; इतर प्रवासी गाड्या अडीच तास लेट, प्रवाशांचे हाल

केत्तूर (अभय माने); सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या चालत्या सिमेंट वाहतूक करणारी मालगाडीचे जिंती रोड (ता.करमाळा) स्टेशननजीक सकाळी नऊ पंचवीस च्या आसपास (309/09 किलोमीटर) कपलिंग तुटल्याने दोन भाग झाले होते त्यामुळे सदर गाडी मेन लाईनवर थांबली त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या बेंगलोर नवी दिल्ली एक्सप्रेस (गाडी नं.12627) के के एक्सप्रेस स्थानकावर सुमारे अडीच तास पारेवाडी थांबविण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मात्र पाण्यासाठी मोठे हाल झाले.

पारेवाडी स्थानकावर थांबविण्यात आलेली केके एक्सप्रेस

मालगाडीचे कपलिंग मेन लाईनवरच तुटल्याने त्याचा फटका मात्र इतर प्रवासी गाड्यांना बसला.हा मार्ग व्यवस्थित होताच दुपारी बाराच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली.

छायाचित्र १) जिंती रोड स्टेशन नजीक मालगाडीची तुटलेले कपलिंग
2) पारेवाडी स्थानकावर थांबविण्यात आलेली केके एक्सप्रेस

litsbros

Comment here