करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा बस आगारात वाढीव एसटी बस द्या; मा.आ.नारायण पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा बस आगारात वाढीव एसटी बस द्या; मा.आ.नारायण पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा बस आगारात वाढीव एस टी बसेसची मागणी केली असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करमाळा आगारातील प्रलंबित प्रश्नांवर व मागण्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की करमाळा तालूक्यातील 115 गावांमध्ये दळणवळणासाठी लालपरी पोहचली जावी.

गाव तिथे एस टी ही संकल्पना प्रत्यक्षात अवलंबली गेली पाहिजे. आज तालूक्यात जवळपास 50 हायस्कूल आहेत तर काही करमाळा व जेऊर येथे महाविद्यालय कार्यरत आहेत.

करमाळा तालुक्यातील हजारो विद्यार्थी आपले गाव सोडून इतर गावी जिथे हायस्कूल अथवा महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवास करत असताना त्यांना एस टी बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे.

आज किती तरी गावात फक्त एकदाच एस टी येते व यानंतर त्या गावात कोणतीही बसगाडी येत नाही. हि वस्तुस्थिती असुन आता विद्यार्थी व रुग्ण तसेच जेष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना दळणवळणाची सुविधा मिळाली पाहिजे.

एकीकडे जेष्ठ नागरिकांना व महिलांना अर्धे तिकीट काढून प्रवास करता येतो. परंतू केवळ आपल्या रहिवासी गावात एस टी नसल्याने या चांगल्या सवलती पासून सदर लाभार्थ्यांना मुकावे लागत आहे.

हेही वाचा – दुःखद – हिसरे येथील माजी सरपंच बाळनाथ जगदाळे यांचे निधन

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने रावगांव येथे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न

करमाळा आगारात एस टी गाड्यांची संख्या कमी असल्याने ही समस्या प्रलंबित कायम तशीच राहीली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तालुका पातळीवर असलेल्या इतर आगारातील बस संख्या कमी आहे.

तरी तालूकातर्गत तसेच तालूक्याबाहेर इतर शहरे तसेच हाॅस्पिटल, काॅलेजेस, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळ व शासकीय कार्यालये या ठिकाणी जाता यावे म्हणून करमाळा आगारात एस टी बस संख्येत वाढ करावी ही मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली असून लवकरच प्रत्यक्ष भेटून दळणवळणाचा हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

litsbros

Comment here