करमाळा बाजार समिती अखेर बिनविरोध; जगताप गटाच्या हाती सत्ता; क्लिक करून वाचा नव्या संचालकांची नावे
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर माजी आमदार जयंतराव जगताप गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून यामुळे जगताप गटात एक प्रकारे नवचैतन्य निर्माण झाले आहे जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी चौका चौकात फटाकेची आतिशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.
सदरची बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याकामी मोहिते पाटील गटाचे मोठे योगदान आहे माजी आमदार जयंतराव जगताप नारायण आबा पाटील तसेच बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांना एकत्रित करण्या कमी मोहिते पाटील गटाचा मोठा सिंहाचा वाटा आहे अखेर तिन्ही गटात समझोता करून सदरची निवडणूक बिनविरोध करण्याकामी मोहिते पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक बिनविरोध झाली आहे. मोहिते पाटील यांनी केलेल्या जगताप, पाटील व बागल यांच्यातील समझोता आणि शिंदे गटाने जगताप यांना दिलेला पाठिंबा यामुळे हे शक्य झाले आहे.
अतुल खुपसे व भाजपचे उमेदवार काय निर्णय घेतील याची उत्सुकता लागलेली असताना शेवटच्या क्षणी ही निवडणुक बिनविरोध झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. १८ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
हे आहेत बिनविरोध उमेदवार –
सहकारी संस्थामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, विलास गुंडगीरे, सागर दोंड, जनार्धन नलवडे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे.
महिला राखीव : साधना पवार, शौलजा मेहर.
इतर मागासवर्ग : शिवजी राखुंडे.
भटक्या जमाती : नागनाथ लकडे.
ग्रामपंचायत : कशीनाथ काकडे, नवनाथ झोळ, बाळू पवार, कुलदीप पाटील.
व्यापारी प्रतिनीधी : मनोज पितळे व परेशकुमार दोशी.
हमाल तोलार : वालचंद रोडगे
Comment here