करमाळा सोलापूर जिल्हा

करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर- दिनेश मडके

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर- दिनेश मडके*

करमाळा (अभय माने) ‌डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब प्रदेश उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना शाखा करमाळा कार्यकारणी करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश उद्धवराव मडके यांनी करमाळा येथील शासकीय विश्रामगृह येथे 1 मार्च रोजी आयोजित कार्यकारिणी निवड बैठकीत जाहीर केली आहे .करमाळा तालुका उपाध्यक्षपदी टी. व्ही 9 मराठीचे शितलकुमार मोटे , कमलाईनगरीचे संपादक जयंत दळवी, करमाळा लाईव्हचे संपादक गौरव मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

तर सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर,यांची पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे. सहसचिवपदी सुर्यकांत होनप खजिनदारपदी ॲड. सचिन हिरडे सहखजिनदार किशोरकुमार शिंदे तालुका संघटक राजू सय्यद सहसंघटक तुषार जाधव तालुका संपर्कप्रमुख अंगद भांडवलकर सहसंपर्कप्रमुखपदी सागर गायकवाड, तालुका व्यवस्थापक संजय साखरे तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल दामोदरे तालुका प्रवक्तेपदी प्रा.नंदकिशोर वलटे,कार्यवाह नितीन झिंजाडे *सहकार्यवाह राजाराम माने यांची निवड करण्यात आली आहे.* बैठकीला उपस्थित असणाऱ्या नवनियुक्त सर्व पत्रकार बांधवांना निवड पत्र देऊन सन्मान करण्यात आला. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनियुक्त प्रवक्ते प्रा. नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन गाडे, राहुल रामदासी शेखर स्वामी ,संजय मस्कर, सचिन चव्हाण,प्रवीण अवचर ,अविनाश जोशी, संजय कुलकर्णी ,नागेश चेंडगे सचिन जव्हेरी संजय तेली यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे, ॲड बाबूराव हिरडे, नासिर कबीर, अलीम शेख ,आशपाक सय्यद,अशोक नरसाळे, सुहास घोलप डी. जी पाखरे ,आण्णा काळे यांची निवड करण्यात आली आहे.

डिजिटल मिडियाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये यांनी शासनमान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे.विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा चालू असून ‌‌ लवकरच आपल्याला शासन मान्यता मिळणार आहे.केंद्र राज्य शासनामार्फत त्याची प्रकिया सुरू आहे. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या संकल्पनेतून भगिरथ अथक प्रयत्नांमधून डिजिटल मिडिया पत्रकारितेला अधिमान्यता मिळाली आहे.त्यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळवून देणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्द राहून काम करणार आहे.

याबरोबरच प्रिंट मिडियाप्रमाणेच डिजीटल मिडियाला शासनाच्या जाहिराती व अधिस्विकृती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पत्रकार सुरक्षा विमा योजना पत्रकार कुटुंब कल्याण योजना पेन्शन योजना पत्रकारांना शासन दरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघ काम करीत आहे . राजा माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळवून देणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्दा राहून काम करणार आहे. सहा एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील सावंतवाडी येथे अधिवेशन संपन्न होणार आहे .

हेही वाचा – अक्कलकोट येथे दिव्यांग मुलांसाठी मोफत होमिओपॅथिक शिबिर

मुलाच्या हत्येप्रकरणी केडगाव येथील आरोपी पित्यास जामीन मंजूर

राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया क्षेत्रातील महाराष्ट्रातून हजारो पत्रकार उपस्थित राहणार आहेत .या अधिवेशनामध्ये नक्कीच पत्रकारांना दिलासा देणारा निर्णय होऊन‌ शासन मान्यता मिळून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कल्याणासाठी हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असून डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार बांधव जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याचे तालुका अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी सांगितले आहे.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!