*कणगी झाल्या कालबाहय*
केत्तूर ( अभय माने) पूर्वीच्या काळी ज्वारी बाजरी गहू साठवण्यासाठी विविध पद्धती उपयोगात आणल्या जात होत्या. त्यातीलच एक म्हणजे कणगी हा महत्त्वाचा घटक होता. या कणगीमध्ये कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके धान्य साठवून ठेवले जात असे ते 2/3 वर्षापर्यंत सुस्थितीत राहत होती परंतु, सध्याच्या आधुनिक काळात कणगीची जागा पत्रा व लोखंडी कोठयांनी घेतली असल्याने कणगी मात्र इतिहासजमा व कालबाह्य झालेल्या आहेत.
कणगीही प्रामुख्याने बांबूच्या पातळ काड्यांनी विणली जायची. ती 7 ते 8 फूट उंचीची असायची ती आतून बाहेरून शेनानी सारवून वाळवली जायची त्यानंतर उन्हात वाळवून ठेवलेले धान्य यामध्ये भरले जायचे धान्य भरल्यानंतर कडुलिंबाचा पाला तोंडाभोवती ठेवला जात अशी तोंड बंद केले जायचे त्यामुळे वर्षभर टिकणारे व कीड न लागणारे धान्य खायला मिळत असे. कणगी मध्ये कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय वर्षभर वर्षभराचे धान्य साठवले जात असे.
जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबेत स्थलांतरित करण्यास मंजूरी
कणगीमध्ये धन्य सुरक्षित राहत होते तसेच धान्याला कीड लागण्याचा धोका होत नव्हता. मात्र सध्याच्या पत्र्याचे व लोखंडी कोठ्यामध्ये धान्य चांगले राहते की नाही ? याची वारंवार खातरजमा वारंवार करावी लागते हे धान्य वर्षभर व्यवस्थित राहत नाही.