म्हणून जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांना निकाल देणार 6 मे रोजी, विद्यार्थ्यांत उत्सुकता
केत्तूर ( अभय माने) एक मे रोजी इयत्ता 1 ली ते 11 वी वर्गाचे वार्षिक निकाल जाहीर होण्याची परंपरा आहे परंतु यावर्षी मात्र निकालाला अपवाद ठरला आहे.1 मे रोजी जाहीर होणारे हे निकाल आता 6 मे रोजी जाहीर होणार आहेत.
छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त मे रोजी हा निकाल जाहीर होणार आहे एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शासनाने एक परिपत्रक काढून याबाबत ही माहिती दिली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त शाळांचा निकाल जाहीर होणार आहे.
शिक्षकांना मात्र 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून 6 मे रोजी त्यांना निकाल जाहीर करण्यासाठी शाळेत यावे लागणार आहे अशी केत्तूर जिल्हा परिषद केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख विकास काळे यांनी दिली आहे.
Comment here