हुश्श इंग्रजी विषयाचा पेपर संपला पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी
केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्यातील केत्तूर केंद्रावर दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. शनिवार (ता.1) रोजी इंग्रजीचा पेपर संपल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. पेपर संपतच विद्यार्थ्यांनी हुश्श संपला एकदा इंग्रजीचा पेपर असा भाव होता.
या परीक्षा केंद्रावर बैठे पथक कार्यरत असून सर्व परीक्षा कॉपीमुक्त व शांततेच्या वातावरणात सुरू असल्याची माहिती केंद्रप्रमुख प्राचार्य काशिनाथ जाधव यांनी दिली. मात्र परीक्षेसाठी 5 विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या पेपरला दांडी मारली. 312 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.
हेही वाचा – सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत आरपीएफ जवान ठार;जिंती येथील घट
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट
केत्तूर एस. एस. सी. केंद्र क्रमांक 3044 वर परीक्षेसाठी 317 विद्यार्थी प्रविष्ट असून 13 वर्ग खोल्यामधून सदर परीक्षेचे नियोजन केले गेले आहे. केंद्र संचालक म्हणून प्राचार्य काशिनाथ जाधव व उपकेंद्र संचालक म्हणून भीमराव बुरुटे व किशोर जाधवर हे काम पाहत आहेत. सदर केंद्रावर केतुर न.2, कोर्टी, कुंभारगाव, सावडी, भिलारवाडी, कात्रज येथील विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून परीक्षा देत आहेत.
छायाचित्र- केत्तूर: परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाचा पेपर देताना विद्यार्थी वर्ग (छायाचित्र- राजाराम माने,केत्तूर)