नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गोयेगाव-आगोती पुल उभारण्यासाठी प्रयत्न करणार-गणेश कराड
करमाळा प्रतिनिधी – उजनी जलाशय मुळे करमाळा तालुक्या सह कर्जत, जामखेड,परांडा,इंदापूर,बारमती,
फलटण, माळशिरस येथील जनतेस मध्यवर्ती ठिकाणावरुन सक्षम वाहतूक व्यवस्था होणे साठी करमाळा तालुक्यातील गोयेगाव येथुन इंदापूर तालुक्यातील आगोती या ठिकाणी उजनी जलाशयावर राष्ट्रीय जलमार्ग अंतर्गत पुल उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नुतन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे गणेश कराड यांनी माहिती दिली.
हेही वाचा – कुगाव-शिरसोडी पुलाचे काम प्रचंड वेगात चालू….
गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश
काही दिवसांपूर्वी गोयेगाव-आगोती पुलाचा शासकीय सर्व्हे झाला असून डिकसळ पुला पासून गोयेगाव हे अंतर 26किलोमिटर आहे.तर कुंभेज फाटा ते गोयेगाव हे अंतर ही 26किलोमिटरच आहे.गोयेगाव पासून पुणे-बंगळुर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-9 चे अंतर फक्त पाच किलो मीटर आहे.या पुलाच्या मागणी साठी करमाळा तालुक्यातील 25 तर इंदापूर तालुक्यातील 18 ग्रामपंचायत ने मागणी ठराव केले आहेत.
गोयेगाव-आगोती ठिकाण मध्यवर्ती असल्याने शासन या ठिकाणास प्राधान्य देईल असे गणेश कराड यांनी सांगितले.