करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात करा; माजी नगरसेविका सविता कांबळे
करमाळा(प्रतिनिधी);
करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी बागल गटाच्या माजी नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ सविता जयकुमार कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सौ कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की करमाळा शहरातील पाणीपुरवठा हा सध्या विस्कळीतपणे चालू असून सदरचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा सध्या उजनी जलाशय 100% भरले असून केवळ करमाळा नगरपालिकेच्या भोंगळ व दुर्लक्षितपणामुळे करमाळा शहराला पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही त्यामुळे शहरातील पाणी गेली काही दिवसापासून व्यवस्थितरित्या येत नसल्याचे खंत सौ सविता जयकुमार कांबळे यांनी पत्रका मध्ये म्हटले आहे.
करमाळा शहरातील पाणीपुरवठा चार दिवसातून एकदा असा होतो तर कधी तांत्रिक अडचणीच्या बाबी सांगून पाणीपुरवठा केला जात नाही. केवळ नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सदरचा पाणीपुरवठा व्यवस्थित रित्या होत नाही तेव्हा करमाळा शहराला होणारा पाणीपुरवठा हा नियमितपणे करण्यात यावा अन्यथा या विरोधी आम्ही महिला नगरपालिका समोर लाक्षणिक उपोषणास बसू असा इशारा शेवटी सौ कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी दिला आहे.
हेही वाचा – पाणलोट अन पोमलवाडी ……. ( माझी 50 वर्षांपूर्वीची पोमलवाडी )
क्षितिज महिला ग्रुप कडून श्रीराम प्रतिष्ठानच्या लाभार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप
करमाळा शहराला पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही महिनाभरातील पाणीपट्टी न भरता फक्त पंधराच दिवसाचे पाणी पट्टी भरू असे आवाहन नगरपालिकेच्या मा. नगरसेविका जयकुमार कांबळे यांनी केले आहे.