आरोग्य करमाळा सोलापूर जिल्हा

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

केत्तूर(अभय माने) . इंग्रजी भाषा कार्यशाळेत करिअर व भविष्यातील संधी या विषयावर डॉ. प्रचिती पुंडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
प्रा.डॉ. गणेश करे – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय इंग्रजी भाषा कार्यशाळेमध्ये हा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर समुपदेशक व सुप्रसिद्ध वक्त्या डॉ. सुनिता दोषी , संगमेश्वर महाविद्यालय सोलापूरचे मा.उपप्राचार्य प्रा.डॉ. धनाप्पा मेत्री सर, लेखिका व प्रोलक्स कंपनीच्या डायरेक्टर डॉ. प्रचिती पुंडे , पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पूणेचे इंग्रजी भाषा तज्ञ प्रा. श्रीधर नागरगोजे सर, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. राजकुमार पाटील , इंग्रजी विषय संघटनेचे सोलापूर जिल्हा मा. अध्यक्ष श्री.गुरुनाथ मुचंडे , प्रा. भिष्माचार्य चांदणे, उपस्थित होते.

तसेच पंचायत समिती करमाळा चे इंग्रजी विषय समन्वयक श्री. रेवण्णाथ आदलिंग, नवनियुक्त सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, इंग्लीश टीचर्स असोसिएशन करमाळा तालुका अध्यक्ष श्री.कल्याणराव साळुंके, सचिव श्री. गोपाळराव तकीक- पाटील , सहसचिव श्री.मारूती जाधव , प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलबिले , प्रा. विष्णू शिंदे, प्रा. जयेश पवार, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक बांधव आणि सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व सर्व तालुका अध्यक्ष व सचिव शिक्षक उपस्थित होते.

पंचवीस हून अधिक पुस्तके लिहीणाऱ्या डॉ.प्रचिती पुंडे यांनी आपल्या लेखनात मनाचे आरोग्य या विषयी सविस्तर लेखन केलेले आहे याच कार्याची दखल घेत या वर्षीचा इंस्पीरेशनल बूक अॅवार्ड 2024, देऊन सन्मान करण्यात आला.

यापुढे करमाळा तालुक्यातील इंग्रजी भाषेतून लेखन करणाऱ्या लेखकांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जाणार असल्याचे प्रा.डॉ.करे पाटील यांनी जIहीर केले .

हेही वाचा – श्रीराम प्रतिष्ठान करमाळा आयोजित भव्य-दिव्य सामुदायिक विवाह सोहळा ४ फेब्रुवारीला,नागरिकांनी मोठ्या संख्येने शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे : गणेश चिवटे

करमाळ्याचे सुपुत्र उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुखदेव गिलबिले, प्रा.विष्णू शिंदे प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी केले तर आभार सहसचिव प्रा. मारूती जाधव यांनी मानले .

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!