करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
देवाच्या कार्यक्रमाला चाललेल्या भक्तांच्या गाडीचा वीट जवळ अपघात
करमाळा(प्रतिनिधी): देवाच्या कार्यक्रम साठी पुणे जिल्ह्यातील दौंड येथून तालुक्यातील करमाळा तालुक्यातील झरे या गावी जात असलेल्या छोटा हत्ती या गाडीला करमाळा तालुक्यातील वीट येथे अपघात झाल्याने छोटा हत्ती मधील दहा जण जखमी झाले आहेत.
रस्त्यावरून जात असताना वीट जवळ छोटा हत्ती वरील नियंत्रण सुटल्याने अचानक गाडी रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाला आहे. छोटा हत्ती मधील जखमी आठ लोकांवर करमाळा कोटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे सर्वजण दौंड मधील वडार गल्ली येथील रहिवासी आहेत. याबाबत अधिक तपास केला जात आहे.
Comment here