Uncategorized

दुर्दैवी! अवघ्या15 मिनिटांच्या अंतराने वडील आणि मुलाचा मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी! अवघ्या15 मिनिटांच्या अंतराने वडील आणि मुलाचा मृत्यू

रात्री कुटुंबासोबत जेवण सुखासमाधानानं झालं आणि औषध घेऊन जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील फलटण शहरात घडली आहे.

फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांच्या मृत्यूचं नेमके कारण समजू शकलेले नाही. हनुमंतराव रामभाऊ पोतेकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.


वडील हनुमंतराव आणि त्यांच्या मुलाने कुटुंबासमवेत जेवण केलं, त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास हनुमंतराव ,मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल केलं.
पहाटे हनुमंतराव पोतेकर आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी अमित पोतेकर यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या मुलीची तब्येत सुधारली असून नक्की मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही. विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. या पिता पूत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील तपास ते करत आहेत. मात्र कोणत्याही प्रकारचं औषध घेताना तुम्ही डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने घ्यावं नाहीतर नुकसान होऊ शकतं. वडील आणि मुलाचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजू शकतं.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!