लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकांना रंगेहाथ पकडले
2700 रुपयेची लाच घेतल्या प्रकरणात शहर वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाला अँटीकरप्शन पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकांत बलभीम जाधव (वय 57, रा. सोलापूर) असे लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनचालकावर कारवाई केली होती.
या कारवाईमधील वाहन सोडवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी 2700 मागितले. गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय परिसरामध्ये पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडून 2700 घेतले. यातील 700 रुपयांची ऑनलाइन पावती केली. राहिलेली दोन हजाराची रक्कम लाच स्वतःकडे ठेवली. लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी सोलापूर शहर पोलीस दलात अनेक वर्ष अंमलदार म्हणून सेवा बजावली आहे. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले आहेत.
Add Comment