करमाळा सोलापूर जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी यशाचे  गड जिंकावेत: प्रा. लावंड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी यशाचे  गड जिंकावेत: प्रा. लावंड

केत्तूर (अभय माने ) छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी यशाचे आधुनिक गड जिंकावेत असे प्रतिपादन प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी केले. तेदहिगाव शेळके वस्ती जि.प.शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.

प्रा. लावंड पुढे म्हणाले की,
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा जीवन प्रवास संघर्षमय होता. आव्हानांवर मात करत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या करारी व जिवलग मावळ्यांचे संघटन आणि नियोजन व अचूक व्यवस्थापन यामुळे अनेक आश्चर्यकारक विजय मिळवले. विद्यार्थ्यांनी शिवतंत्र आत्मसात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत व यशाचे गड काबीज करावेत असे स्फूर्तीदायी विचार व्यक्त केले.

हेही वाचा – जनसेवा हीच ईश्वर सेवा फाउंडेशन केत्तूर मधील सदस्यांनी मिळवून दिला दोन निराधार महिलांना आसरा

जागतिक पाणथळ दिनानिमित्त यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन अभ्यासगटाचे ताडोबात पक्षीनिरीक्षण. चंद्रपूरातील पाणथळ परीसरात पक्ष्यांसह वन्य जिवांचीही नोंदविली निरीक्षणे.

याप्रसंगी ,दहीगावचे सरपंच संजय दादा गलांडे,वि .का. सोसा. चेअरमन हरिश्चंद्र शेळके, शा.व्य.समिती अध्यक्ष ज्योतिराम पाडुळे, उपसरपंच नितीन नरुटे , मा. अध्यक्ष बापू कोंडलकर, शा.व्य. समिती उपाध्यक्ष महादेव शेंडगे ,रवी पाडुळे ,पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, गोपाळ तकीक-पाटील, मुख्या. दस्तगीर शेख उपक्रमशील शिक्षक विजयकुमार राऊत.अंगणवाडी ताई,बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते,
याप्रसंगी प्रा.लावंड यांना राजमुद्रा असलेली शिवप्रतिमा भेट देण्यात आली आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने मिष्टान्न जेवण देण्यात आले.छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!