करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी करमाळा येथील चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी करमाळा येथील चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); भारतीय जनता पार्टीचे युवा नेते दीपक चव्हाण यांच्या पक्षाच्या संघटनात्मक कामाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य म्हणून केलेली निवड ही सार्थ असून या पदाचा उपयोग
करमाळा शहराच्या विकासात्मक बाबी तसेच तालुक्याच्या विकास कामात उपयोग करावा असे मत पत्रकार जयंत दळवी यांनी व्यक्त केले.

दीपक चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार भाजपा व्यापार आघाडी च्या वतीने करण्यात आला
यावेळी दळवी पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भाजपा असा प्रवास चव्हाण यांनी केला, त्यांचे संघटनात्मक कार्य उल्लेखनीय आहे.

यामुळेच प्रदेशाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे, ते क्षमतेने ही जबाबदारी पेलतील तसेच राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे करमाळा शहराच्या विकासासाठी तसेच तालुक्यातील विकासासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे
यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे ,पत्रकार अलीम शेख ,भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, ऑल इंडिया ह्यूमन राइट चे करमाळा तालुका अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख ,

हेही वाचा – करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार, केळीच्या बागा उद्ध्वस्त; कोट्यवधींचे नुकसान शेतकरी अध्यक्ष

करमाळा तालुक्यातील ‘या’ प्रश्नासाठी मे महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार; पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

भाजपा माजी शहराध्यक्ष महेश परदेशी, भाजप व्यापार आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया, केकान सर ,झरेचे युवक नेते गणेश आमृळे, संजय गांधी निराधार योजनेचे
नरेंद्रसिंह ठाकुर ,अभावीप चे संतोष कांबळे, अतुल बोकन आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here