बालचमुंच्या कलाविष्काराने पोफळजकर मंत्रमुग्ध……
यशकल्याणी सेवाभावी संस्थेकडून शाळेला बावीस हजारांची मदत तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान .
केत्तूर ( अभय माने) पोफळज येथील जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात बहारदार गीतांवर नृत्य सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे गीत,भक्ती गीते, लोकगीत, समूहनृत्य, भीमाच्या नावांन कुंकू,पारंपारिक गीतांसह छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व नाटिका सादर करून चिमुकल्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनी रोख रकमेची बक्षीसे देऊन सहभागीं विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रथमतः मान्यवरांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील हे होते. तर मा. संचालक रामचंद्र पवार, मा.सरपंच मारूती पवार, मा.बिभिषण गव्हाणे, मा.सरपंच दत्तात्रय गव्हाणे, शा. व्य.चे राहूल धुमाळ, स्नेहल पवार, अंबादास कांबळे, प्रा.विष्णू शिंदे, प्रा.बाळकृष्ण लावंड.
सकाळचे पत्रकार गजेंद्र पोळ, पुढारीचे पत्रकार प्रशांत नाईकनवरे, रमाकांत सुरवसे, जालिंदर पवार, अक्षय कुलकर्णी,
उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका मुमताज पठाण यांनी केले. शिक्षिका रेखा शिंदे- साळुंके, शुभांगी शिंदे-बोराटे, जहांगीर सय्यद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
हेही वाचा – सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत आरपीएफ जवान ठार;जिंती येथील घट
केत्तूर परिसरातील नागरिकांनी घेतला ” छावा ” या ऐतिहासिक चित्रपटाचा आनंद
याप्रसंगी मुंबई पोलिस दलात निवड झाल्या बद्दल सागर तुकाराम पवार तसेच कृषीअभियांत्रिकी विभागात विद्यापिठामधून प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल कु.श्वेता संपतराव शिंदे हिचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक श्रीकृष्ण भिसे
व फौजमल पाखरे यांनी केले तर आभार निलेश जाधवर यांनी आभार मानले.