करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले यंदाच्या शासकीय पूजाचे मानाचे वारकरी;मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली शासकीय पूजा
पंढरपूर – आषाढी शासकीय पूजेचा मान यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या दाम्पत्यास मानाच्या वारकरीचा मान मिळाला. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक या दांपत्यासह शासकीय पूजा केली.
हेही वाचा – केतूर ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर; क्लिक करून वाचा कोणत्या वॉर्डातून कोणाला संधी?
काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. त्यांना देखील नमन करून त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावे अशी मनोकामना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
Comment here