Uncategorizedकरमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात आरक्षण बाबत सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात; गुरुजी सर्व्हेला, विद्यार्थी वाऱ्यावर!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात आरक्षण बाबत सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात; गुरुजी सर्व्हेला, विद्यार्थी वाऱ्यावर!

केत्तूर (अभय माने ) राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी शासनातर्फे 23 जानेवारीपासून केत्तूर (ता.करमाळा) परिसरात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

मराठा समाजासह सर्वच कुटुंबाचे सर्वे करण्यात येत आहेत समाजाची आर्थिक व मागासपणाचे सर्वे यावेळी करण्यात येत आहेत संपूर्ण गावातील कुटुंबाचे सर्वे होणार आहेत.या सर्व मध्ये 187 प्रश्न विचारले जात असून आर्थिक व सामाजिक मागासलेपणा असलेलेची माहिती मोबाईल ॲप मध्ये भरून घेतली जात आहे. 23 जानेवारीपासून ही काम सुरू झाली असून 31 जानेवारी पर्यंत उरकायचे आहे.

यामध्ये घर कशा प्रकारचे आहे,घरात वीज कनेक्शन आहे की नाही, घरात पंखा आहे का ?, गॅस आहे का ?, घरामध्ये खोल्या किती आहेत, वार्षिक उत्पन्न किती आहे,घरातील कुटुंब संख्या किती आहे,मुलांचे शिक्षण किती झाले आहे.घरामध्ये शौचालय आहे का बाथरूम वेगळे आहे का ? ते कशा प्रकारचे आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत.

हेही वाचा – उत्तरेश्वर युवा परिवर्तन ग्रुपच्या वतीने करमाळा तालुक्यातील ‘या’ पत्रकारांचा झाला सन्मान

स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा;गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी

सदरचे सर्वेक्षण हे शिक्षकांच्या माध्यमातून केले जात असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षकाला ऐवजी बेरोजगार तरुणांना हे काम देणे गरजेचे होते अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकास अचूक व बिनचूक माहिती द्यावी तसेच सर्वेक्षणाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

litsbros

Comment here