करमाळासोलापूर जिल्हा

आ.संजय मामा समर्थकांनी आयोजित केलेल्या महिला दिन व सावित्रीमाई स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘माहेर मेळाव्या’ला महिलांची प्रचंड गर्दी; तहसीलदार समीर माने यांचे मार्गदर्शन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ.संजय मामा समर्थकांनी आयोजित केलेल्या महिला दिन व सावित्रीमाई स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘माहेर मेळाव्या’ला महिलांची प्रचंड गर्दी; तहसीलदार समीर माने यांचे मार्गदर्शन

करमाळा (प्रतिनिधी);
“2020 ते 22 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जगभर कोविडचे संकट घोंगावत असताना आरोग्य विभाग मात्र सजग होता या आरोग्य विभागांमध्ये गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांनी केलेले कार्य खरोखरच अभिमानास्पद असून त्याची पोहोच पावती म्हणून आज त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे. त्याचा मला मनस्वी आनंद आहे” असे प्रतिपादन करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले. निमित्त होते आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त आज 10 मार्च रोजी करमाळ्यात आयोजित केलेल्या माहेर मेळावा या कार्यक्रमाचे.

यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत ,तालुका आरोग्य अधिकारी श्रद्धा भोंडवे, उपजिल्हा रुग्णालय करमाळा च्या स्त्री रोग तज्ञ डॉ. स्मिता बंडगर, महिला व बालविकास विभागाचे श्री माने साहेब ,एपीआय जगदाळे साहेब ,एड. सविता शिंदे, सौ नलिनी जाधव, चौरे मॅडम, नंदिनी लुंगारे, राजश्री कांबळे आदी उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील गाव पातळीवर मूलभूत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांचा सन्मान सोहळा आज विकी मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केला होता. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले की, महिलांच्या जीवनामध्ये संथ गतीने क्रांती होत आहे. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रीला सती जावं लागत होतं, पुढे ही प्रथा बंद होऊन स्त्रीला विधवा म्हणजे तिचं रूप कुरूप केलं जायचं.

आता ती पद्धतही बंद होऊन विधवा स्त्रीचा उल्लेख एकल स्त्री असा करून तिला समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळत आहे. याच्याही पुढे जाऊन स्त्रीचा आत्मसन्मान जागा करण्यासाठी स्त्रियांनी केलेल्या कामाची गौरवगाथा समजून घेण्यासाठी असे सन्मान सोहळे आयोजित होणे गरजेचे आहे.

आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ही एक चांगली सुरुवात यानिमित्ताने केलेली आहे .माहेर म्हणजे आपलं घर असतं हक्काच. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी अंगणवाडी सेविका अलका सकट, अनुपमा भोसले ,आशा स्वयंसेविका अनिता ढेरे ,अवचर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. सविता शिंदे यांनी केले.

हेही वाचा – भंगारा पेक्षा ही कांद्याला कमी भाव; हमीभाव व अनुदान जाहीर करा अन्यथा रास्ता रोको करू; रासपचे करमाळा तहसीलदारांना यावेळी

करमाळयासह इतर सहा तालुक्यांमध्ये तब्बल बारा मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरांना करमाळा पोलिसांनी घातल्या बेड्या

तर अध्यक्ष मार्गदर्शन आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा भोंडवे यांनी केले. आभार स्नेहल अवचर यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ. शितल क्षीरसागर यांनी केले.

सदर माहेर मेळाव्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका , मदतनीस तसेच आरोग्य विभागाच्या अशा स्वयंसेविका यांना गणवेशाची साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .

litsbros

Comment here