आई, वडील रोजंदारीवर कामाला, मुलीने पटकाविले ९६ टक्के गुण; अँड्रॉइड मोबाईल देउन सन्मान
केम (प्रतिनिधी संजय जाधव);
आई, वडील रोजंदारीवर काम करतात घरची परिस्थिती बेताची पण या परिस्थितीवर मात करीत मुलीने दहावीच्या परीक्षेत ९६टक्के गुण मिळवून केम केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला, श्रावणी वेदपाठक हिच्या आई सोनिया वेदपाठक या केम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रोजंदारीवर कॉम्प्युटरची कामे करतात.
तर वडील रोजंदारीवर डि,सी,सी, बॅंक येथे शिपाई म्हणून टेपंर वारी काम करतात श्रावणी वेदपाठक हिला केम येथील क्लासेस च्या संचालिक नागटिळक मॅडम यांनी तिचा मोफत क्लास घेतला नागटिळक मॅडम चे तिला बहू मूल्यं मार्गदर्शन लाभले.
तिची परिस्थिती गरीबीची असल्याने मोफत क्यालास घेतला नागटिळक मॅडम चे मोलाचे मार्गदर्शन लाभले तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचा नागटिळक साहेब यानी मोबाईल देउन सन्मान केला.
Add Comment