माढासोलापूर जिल्हा

आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

माढा / प्रतिनिधी – माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा माढा प्रेस क्लबचे सदस्य राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना खैराव येथील श्री नागनाथ देवस्थान ट्रस्ट व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा सन -2024 चा “आदर्श पत्रकार” पुरस्कार जाहीर झाला आहे .20 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात 8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता समारंभपूर्वक त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,शाल,पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.

राजेंद्र गुंड यांनी भूगोल व मराठी विषयांतून एमए चे शिक्षण पूर्ण केले असून प्रथम श्रेणीत बीएड चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी शालेय पदविका व्यवस्थापन अभ्यासक्रम व पत्रकारितेचा कोर्सही विशेष प्राविण्यासह पूर्ण केला आहे.
एक पूरक छंद म्हणून त्यांनी सन 2015 पासून पत्रकार म्हणून सुरुवात केली असून आजतागायत ती यशस्वीपणे सुरू आहे.त्यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महात्मा गांधी साक्षरता मिशन बीड यांच्या वतीने दिला जाणारा ‘ज्ञानमिञ’ हा पुरस्कार 2 वेळा मिळाला.डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा “महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार” मिळाला आहे.माढा रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणारा “राष्ट्राचे शिल्पकार” पुरस्कार मिळाला आहे.

गीतांजली कला महोत्सव अंबाजोगाई यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उपक्रमशील कलाध्यापक पुरस्कार मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने सन 2018 ला “कृतीशील शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाला आहे.विशेष बाब म्हणजे सन 1996 साली माढा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचा “आदर्श विद्यार्थी”पुरस्कार मिळालेला आहे.सन 2019 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मयोगी आमदार बबनरावजी शिंदे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाला आहे.सन 2022 साली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा दिनकरराव जवळकर राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

हेही वाचा – संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव-2024” पुरस्कार कमलाकर दावणे यांना प्रधान

रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी शैक्षणिक,सामाजिक,कृषी, औद्योगिक,राजकीय, आरोग्य, क्रिडा,पर्यावरण आदी विषयांवर वस्तुनिष्ठ पद्धतीने लेखन केले आहे.त्यांच्या लेखनीच्या माध्यमातून अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. माढा तालुक्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख व नावलौकिक निर्माण झाला आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन माढा प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य,संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक, शिक्षक व मानेगावसह तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळी,युवक, मित्रमंडळी व नातेवाईकांनी केले आहे.

फोटो ओळी – आदर्श पत्रकार राजेंद्र गुंड

litsbros