आचारसंहिता सुरू झाली अन चौक, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
केत्तूर ( अभय माने) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेच्या अनुषंगाने करमाळा शहरासह ग्रामीण भागातही उभारलेले डिजिटल फलक हटविल्याने रस्त्याच्या कडांनी तसेच चौकाचौकांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
डिजिटल फलकाद्वारे आव्हान प्रति आव्हान देण्यासाठी कार्यकर्त्याकडून डिजिटल फलक लावले जातात.
यामध्ये वाढदिवस वेगवेगळ्या निवडीचाही समावेश असतो. चौका चौकात या डिजिटल फलकामुळे विद्रूपीकरण केले जाते. परंतु लोकसभेचे आचारसंहिता लागू झाली आणि सर्वच डिजिटल फलक हटविले गेले आहेत.त्यामुळे लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत डिजिटल युद्ध मात्र थांबले आहे.