करमाळा सोलापूर जिल्हा

परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने राजुरीत रक्तदान शिबिर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने राजुरीत रक्तदान शिबिर!

केत्तूर (अभय माने) परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने राजेश्वर हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रविवार, ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी राजुरी (ता. करमाळा) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन युवा नेते तथा जेऊर गावचे सरपंच मा. श्री. पृथ्वीराज भैया पाटील यांच्या शुभहस्ते आणि तालुक्याचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

परिवर्तन प्रतिष्ठान गेली दहा वर्ष सलग रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते. यातून हजारो नागरिकांना रक्ताचा पुरवठा झाला आहे. सेवा, सहयोग हा या भावनेनं सुरू केलेली ही रक्तदानाची चळवळ सुरूच ठेवून आगामी काळात अधिक व्यापक पद्धतीने सुरू ठेवायची असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी सांगितले.

a

हेही वाचा – दिवाळी सुट्टी संपल्याने एसटी तसेच रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर

पोफळज (ता.करमाळा) पर्यावरणपूरक आकाश कंदील किल्ला व पणती रंगवून व शुभेच्छा कार्ड तयार करून दिवाळीचे स्वागत. विद्यार्थ्यांनी केला फटाके मुक्त उत्सवाचा साजरा करण्याचा संकल्प.

या रक्तदान शिबिरात राजुरी आणि पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. परिवर्तन प्रतिष्ठान दर दोन महिन्याला वेगवेगळी शिबिरे आयोजित करत असते. लवकरच आपणांस आगामी शिबिराची तारीख कळवण्यात येणार आहे.हे शिबीर यशस्वी होन्यासाठी सरपंच राजेंद्र भोसले,एकनाथ शिंदे,आबासाहेब टापरे,बंडु शिंदे,उपसरपंच सतीश शिंदे,ग्रा.प सदस्य शरद मोरे,बंडु टापरे,राहुल पाटील याँनी सहकार्य केले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!